सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्य हे सामाजिक कार्य असून सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडून न्याय मिळवुन देण्याचे कार्य करीत आहे, असे प्रतिपादन रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. देविदास काळे यांनी केले. दि. 2 ऑगस्ट रोजी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक वर्धमान फाउंडेशन चे अध्यक्ष तथा बुलढाणा अर्बन को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर विजयबाबू चोरडीया तर विशेष अतिथी पी. के. टोंगे माजी नगराध्यक्ष न.प. वणी, विजय नगराळे सामाजिक कार्यकर्ते, राजु धावंजेवार महाराष्ट्र प्रदेश मानवी हक्क सुरक्षा परिषद हे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे,असेच सदैव तेवत राहो, त्यांनी यावेळी कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. विजय चोरडीया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मानवी हक्क परिषदेने येत्या १० वर्षात अनेक प्रश्न मार्गी लावले आहे. हे विशेष! प्रत्येक माणसाने आपल्या अधिकाराबरोबर आपले कर्तव्य पार पाडावे असेही ते म्हणाले.
या प्रसंगी शासकीय सेवेत नुकतेच रुजु झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसह त्यांच्या आई वडिलांनाही सन्मानित करण्यात आले. व या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तावीक राजु धावंजेवार अध्यक्ष मा.ह.सु.प, यांनी केले. संचालन सागर मुने तर आभार प्रदर्शन सुरेश बन्सोड यांनी केले. या कार्यक्रमाला मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत हनुमंते, जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ.मनिषा निब्रड, जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ.सुमित्रा गोडे, वणी तालुका महिला अध्यक्ष सौ सुनिता काळे, वणी शहर अध्यक्ष सौ. प्रेमिला चौधरी, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय चिंचोलकर, मारेगाव तालुका अध्यक्ष अमोल कुमरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विक्की बांगर, विदर्भ संपर्क प्रमुख मेश्राम यांच्यासह मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.