सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
महागाव : राज्यात शासनाचा महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. आज दिनांक ३/८/२०२५
महसूल सप्ताह अंतर्गत पांदण रस्त्या दुतर्फा झाड लावण्याचा कार्यक्रम मौजा कासारबेहळ पांदण रस्ता येथे माननीय पोलिस पाटील अशोकराव कऱ्हे, तंटा मुक्ति अध्यक्ष मधूकर कऱ्हे, वारोडी सोसायटी अध्यक्ष नंदकुमार मस्के यांच्या हस्ते झाला असून सदर कार्यक्रमाला महागाव मंडळाचे मंडळ अधिकारी पंडित साहेब, ग्राम महसुल अधिकारी अनिल खडसे, भूमी अभिलेख कार्यालयाचे राठोड सर, महसूल सहाय्यक प्रवीण वाहुळे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शंकर गाढवे, प्रशिक बर्डे, राहुल लोंढे, ओमकार पाटे,शिवम कवाने , पांडुरंग बावणे,उपस्थित होते.