सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी या ठिकाणी शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी आदिवासी समाज बांधवाकरिता कोणत्याही प्रकारचे आदिवासी समाज भवन उपलब्ध नाही. असे नगर परिषदेला दिलेल्या निवेदनात मागणी कर्त्यांनी म्हटलं आहे.
शहरात आदिवासी समाजाचे समाज भवन आता तरी व्हावे, या साठी वणी न.प. हद्दीतील जागा आदिवासी समाज भवनासाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी फोरम च्या वतीने वणी नगर परिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी सोशल फोरम वणी मार्फत देण्यात आलेले निवेदन मा. ना. मंत्री महोदय यांनी मुख्याधिकारी न.प.वणी यांच्याकडे जागा मागणीचे निवदेन सुपूर्द केले आहे. आता नगर परिषदने त्यांच्या हद्दीतील जागा उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा आहे. असे फोरमचे अध्यक्ष रमेश मडावी यांनी 'सह्याद्री चौफेर'शी बोलताना सांगितले.