सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगर परिषद मध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रशासक राज सुरु आहे. तेव्हा पासुनच शहरात अनेक जनतेच्या रास्त समस्या आवासून उभ्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मागील अनेक महिन्यापासून युवासेनेचे अजिंक्य शेंडे यांचे तर्फे पत्रव्यवहार निवेदने देण्यात आली. मात्र याकडे जाणीवपूर्वक नगरपरिषदेने दुर्लक्ष करण्याचे कार्य केले,असा त्यांचा आरोप आहे.
या समस्यांच्या निराकरणासाठी शुक्रवारी 1 ऑगस्ट रोजी वणी शहरातील वार्ड क्रमांक 4 मधील महिलांनी अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात पाणी प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी निवेदन सादर केले व घागर मोर्चा नगर परिषदेवर काढण्याचा इशारा दिला. नगर परिषदेत मागील अनेक वर्षापासून मुख्याधिकारी, प्रशासक असल्याने यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. असा संताही व्यक्त त्यांनी केला.
शहरातील गुरुनगर वॉर्ड क्रमांक 4 मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा अत्यंत अनियमित असून, यामुळे विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रश्नाबाबत युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी आक्रमक भूमिका घेत, नगर परिषदेवर थेट कारवाईचा इशारा मिवेदनातून दिला आहे.
या निवेदन प्रसंगी सौ. चिंत्ता पिदुरकर, सौ. शितल कुबडे, सौ. जया एकरे, सौ. रोहिणी धोटे, सौ. शालू धोटे, कमलाबाई मोहोळे, शोभा देठे, शाहिस्ता शेख, माधुरी गोहणे, संगीता ताजणे, राधा महांगळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
अजिंक्य शेंडे यांचा नगर परिषदेवर महिलांचा घागर मोर्चा:युवाकार्यकर्ता अजिंक्य शेंडे यांनी स्पष्टपणे म्हटले की,नगर परिषद नागरिकांकडून वेळेवर पाणीपट्टी वसूल करते. उशीर झाल्यास व्याज आकारते, पण नागरिकांना पिण्याचे पाणी मात्र वेळेवर देण्यात अपयशी ठरते. हे धोरण दुटप्पी व अन्यायकारक आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये महिलांना रात्री अपरात्री उठून पाण्यासाठी धावपळ करावी लागते, ही लाजिरवाणी बाब आहे. जर सात दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महिलांना घेऊन आम्ही थेट नगर परिषद कार्यालयावर 'घागर मोर्चा' घेऊन येऊ,” असा गर्भीत इशारा दिला.