सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मानकी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीचे सरपंच कैलास पिपराडे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले, ग्रामपंचायत सदस्या सौ. नलिनी मिलमीले, परशुराम पोटे, अंगणवाडी सेविका सौ. बेबीताई मालेकर, सुनीता पत्रकार, प्रदिप मालेकर, अविनाश सरवर, अमर खुसपुरे आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी या जग बदलणाऱ्या महामानवास अभिवादन करून मानवंदना दिली.