टॉप बातम्या

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत पेंढरी शाळेला सुयश

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव स्व. चिंधूजी पुरके आश्रम शाळा मारेगाव येथे दि.२७/१२/२०२४ ते ३०/१२/२०२४ पर्यंत पार पडला. त्यामध्ये यावर्षीही १०० टक्के आदीवासी बहुल असलेली नवरगाव केंद्रातील जि.प.उ.प्राथमिक शाळा पेंढरी, पं. समिती मारेगाव या शाळेने तालुकास्तरीय विजेते पद पटकाविले. 

मारेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री स्नेहदीप काटकर, विस्तार अधिकारी (शिक्षण) श्री रामटेके साहेब, सर्व केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक (पं.स.मारेगाव) यांनी कौतुक केले. पेंढरी शाळेला सतत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळविण्यासाठी श्री वडस्कर सर (मुख्याध्यापक), श्री गोंडाणे सर, श्री बडोले सर, श्री टेकाम सर, श्री मनोहर सर व श्री करमणकर सर यांनी अथक परीश्रम घेतले.

यासाठी नवरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री कयापक सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री भास्कर जुमनाके व ईतर सदस्याचे मोलाचे सहकार्य लाभले.


Previous Post Next Post