टॉप बातम्या

चर्मकार महासंघाच्या वतीने सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने दि.15 फेब्रुवारी 2025 ला सामूहिक भव्यदिव्य विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम राष्ट्रीय चर्मकार संघाचे विदर्भ अध्यक्ष संभा वाकुजी वाघमारे यांच्या सुबक संकल्पनेतून करण्यात येत आहे. 
समाजातील युवक युवतीनी तसेच इच्छुकांनी सामूहिक विवाह सोहळ्यात आपले नावाची नोंद दि.१५ जानेवारी २०२५ पुर्वी करावी असे आवाहन आयोजकांनी केले असून या विवाह सोहळ्याला नाव नोंदविण्यासाठी ८६५७४१२३८९ ९९२२९५६९५६,९७६३५७८४३३, ७६६६०८९३२७ या क्रमांकावर परिसरातील युवक-युवतींनी संपर्क साधण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे यांनी केले आहे.




Previous Post Next Post