सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : कॉ.अनिल हेपट यांच्या समर्थनार्थ शहरात "बाईक रॅली" गुरुवारी 14 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजता मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे, टिळक चौक येथून ही बाईक रॅली मार्गक्रमण करणार आहे. यामुळे शहरवासियांचे लक्ष वेधले जाणार हे विशेष...
प्रचार नारळ फुटल्यानंतर कॉ. अनिल हेपट यांच्या प्रचाराची धुरा कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. या उमेदवाराचा वणी विधानसभा क्षेत्रात झंझावात दौरा सुरु असून विरोधकांना भारी पडत आहे. त्यांनी धनशक्ती चा विरोधात जनशक्ती असा दंड थोपटला असून कॉ. अनिल हेपट विजय होणार अशी चर्चा नागरिकात रंगत आहे. विशेष म्हणजे भारतीय कॉम्युनिष्ठ पक्षाच्या वणी विधानसभा मतदार संघातील पक्षाच्या शाखा ऍक्टिव्ह झाल्या, जुने सर्व कार्यकर्ते पक्षासोबत एकवटल्याने परिवर्तनाची लाट जवळ जवळ निश्चित मानली जात आहे.
आतापर्यंत वणी मतदार संघात पहिली, दुसरी आणि तिसरी फेरीला सुरुवात होऊन कॉ.अनिल हेपट हे नक्कीच विजयाच्या दिशेने पाऊल टाकेल असा आशावाद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
गुरुवारी वणीत 'बाईक रॅली', शहरवासियांचे वेधणार लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2024
Rating: