सह्याद्री चौफेर : वृत्तसंस्था
वणी : विधानसभा मतदार संघाकरिता अपक्ष उमेदवार हरीश दिगांबर पाते यांनी प्रसिद्धी पत्रकातुन आपली उमेदवारी कशी सक्षम आहे हे सांगितले. ते कपाट या चिन्हावर लढत आहे.
मतदार संघात एकूणच वीज समस्या, महागाई, बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्न, शैक्षणिक, प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या असून विधानसभा मतदारसंघ प्रदूषणमुक्त झाला पाहिजे पण कोणत्याही उमेदवाराने याकडे लक्ष दिले नाहीत, किंबहुना पुढाकार घेतल्याचे आठवत नाही.
यासाठीच आपण वणी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली असून या मतदारसंघात माझ्या रूपाने परिवर्तनाची नांदी आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे माझ्या वर विश्वास ठेवणारी व्यक्ती आशीर्वाद देईल असे सांगितले. त्यामुळेच आपण आपली उमेदवारी कायम ठेवली असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
विजेच्या समस्या सोडविण्यासाठी माझी उमेदवारी - हरीश पाते
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 13, 2024
Rating: