आ.बोदकुरवार यांचा प्रचार ताफा उद्या मारेगावात धडकणार


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : वणी मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा दिनांक 12 नोव्हेंबर रोज मंगळवार ला सकाळपासून मारेगाव ग्रामीण परिसरामध्ये प्रचार दौरा होणार आहे. आतापर्यंत त्यांना ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात आ.बोदकुरवार हे ग्रामीण जनतेशी संवाद साधणार त्यांच्या समस्या जाणून घेणार आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही देतील.

आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी झरी तालुक्यातील गणेशपुर (खडकी), अडेगाव, खातेरा, वेडद, मुकुटबन, पिपरड, राजूर आदी गावांमध्ये प्रचंड नागरिकांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. त्यांनी महिलांचे सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे हित आणि बेरोजगारांच्या कल्याणासाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील पंचसूत्री योजनेची माहिती दिली. यावेळीही माझ्या कामाची पावती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मंगळवार ला होणाऱ्या या प्रचार रॅलीत मारेगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, मा. संजीवरेड्डी बोदकुरवार समर्थक, भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले आहे.
आ.बोदकुरवार यांचा प्रचार ताफा उद्या मारेगावात धडकणार आ.बोदकुरवार यांचा प्रचार ताफा उद्या मारेगावात धडकणार Reviewed by सह्याद्री चौफेर on November 11, 2024 Rating: 5
Powered by Blogger.