मंगलाताई ठक यांची प्रचारात आघाडी, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हिंगणघाट : विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर अपक्ष उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली. निराधारांच्या आधारवाड सामाजिक कार्यकर्त्या अपक्ष उमेदवार मंगलाताई ठक यांच्या कार्याची माहिती देत या निवडणूकीत "आटो रिक्षा" ला मतदान द्यावे असे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे. 
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट तालुक्यातील सर्व गावात मंगला ठक समर्थक जात असून महिला, युवक शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, जेष्ठ नागरिक, व्यावसायिक यांच्या भेटीगाठी घेत आहे. मतदारसंघांत मंगलाताई ठक यांचे "स्ट्राँग नेटवर्क" असून हे यानिमित्ताने एक हिंगणघाट साठी धडाडीचा महिला आमदार म्हणून एक सामाजिक कार्यकर्ती जे पंधरा वर्षापासून आपल्या संघर्षमय जीवनातून जीचं आयुष्य स्वतःही संघर्षमय आहे. आणि जनतेसाठी केलेला संघर्ष बघून यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राला महिला आमदार मिळेल अशी जनतेची जनतेकडून कल निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 
मंगलाताई विनोद ठक यांचे आटो रिक्षा या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या अपक्ष उमेदवार श्रीमती ठक यांच्या आवाहनाला मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून या निवडणूकीत आटो रिक्षाचीच हवा पाहायला मिळत आहे.
मंगलाताई ठक यांची प्रचारात आघाडी, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंगलाताई ठक यांची प्रचारात आघाडी, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on November 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.