खाडेंची प्रचार रॅली नव्हे जणू विजयी मिरवणूकच; झरी तालुक्यात निनादला शिट्टीचा आवाज

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

झरी जामणी : विधानसभेच्या वणी मतदारसंघातील दूरदृष्टी असणारा अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचार रॅलीला झरी जामणी भागात प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही रॅली नव्हे, तर जणू विजयी मिरवणूकच भासली. ठिकठिकाणी नागरिकांनी वाजतगाजत खाडे यांचे स्वागत केले. काही ठिकाणी त्यांच्या मिरवणूकने संपूर्ण वातावरण उत्साहाने भारून गेले.
आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथून प्रचाराला सुरुवात झाली. मुकुटबन येथील रहिवाशांनी वाजत गाजत संजय खाडे यांचे स्वागत केले. यावेळी शिट्टीच्या आवाजाने संपूर्ण मुकुटबन दणाणून गेले. रॅलीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांचा समावेश होता. त्यानंतर कॉर्नर सभा झाली. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेरकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर प्रचार ताफा अडेगाव, वेळद, खडकी, खातेरा, येडशी आदी गावांमध्ये प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि संधी मिळाल्यास या समस्यांवर तातडीने काम करण्याची ग्वाही दिली. 
या रॅलीदरम्यान माजी आमदार विश्वास नांदेकर व नरेंद्र ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ, चिखलगाव यांनी संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुधाकर गारगाटे, रमेश सुंकुरवार, दिगंबर गौरकर, अशोक झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमोद वासेकर वासुदेवराव विधाते, तेजराज बोढे, अशोकराव चिकटे, राजू अंकितवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्या मंगळवारी संजय खाडे यांचा लाठी-शिंदोला सर्कलचा दौरा आहे. मंदर, केसुर्ली, चारगाव, वारगाव, पुरड, पुनवट, नायगाव, सावंगी, चिंचोली, शिवणी, येनाडी, कोलगाव, साखरा, माथोली, कैलाशनगर इत्यादी गावांचा दौरा आहे. कैलाशनगर येथे प्रचार सभा घेतली जाणार आहे.

संजय खाडे यांच्या मदतीला धावले बँक अभिकर्ते व कर्मचारी
संजय खाडे यांनी एकाही कर्मचारी किंवा एजंटकडून कोणत्याही प्रकारचे डोनेशन न स्वीकारता केवळ कर्तृत्वावर शेकडो कर्मचाऱ्यांना रोजगार दिला. त्यामुळे आम्ही कर्मचारी संजय खाडे यांचा प्रचार करणार असे पतसंस्थेतील कर्मचारी आणि अभिकर्ते यांनी जाहीर केले. यावेळी संजय खाडे सर्वांचे आभार मानत माझे दोनशे एजंट आणि 45 कर्मचारी जनसामान्यात जाऊन प्रचार करतील, असा विश्वास व्यक्त केला. 

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना