आ. बोदकुरवार यांची प्रचारात आघाडी, मारेगाव तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर भाजप महायुतीने प्रचारात आघाडी घेतली. भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विकास कार्याची माहिती देत या निवडणूकीत कमळाला मत द्यावे असे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे.

या दौऱ्यात स्थानिक विकास, रोजगारनिर्मिती आणि भाजपा - महायुती सरकारने जनसामन्याच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकउपयोगी विकासकामे व राबविलेल्या अनेक जनकल्याकारी योजनेची माहिती दिली जात आहे. 

वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील सर्व गावात महायुतीचे पदाधिकारी जात असून महिला, युवक शेतकरी, शेतमजुर यांच्या भेटीगाठी घेत आहे. मतदारसंघांत बोदकुरवार यांच्या पदाधिकाऱ्यांची पकड मजबूत असून हे पदाधिकारी सकाळ पासून रात्री उशिरा पर्यंत मतदारांच्या भेटी घेऊन या निवडणूकीत संकल्प वचननामा कसा सरस याची माहिती देत आहे. या आधारावर येत्या 20 नोव्हेंबर ला 'कमळ' या चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या आवाहनाला मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, या प्रचार मोहिमेत भाजप महायुती प्रचारात आघाडी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.ठिकठिकाणी त्यांचं औक्षण करण्यात येत आहे, साहेब तुम्हीच पुन्हा आमदार आहे, असा शुभआशीर्वाद त्यांना मिळत आहे.
मंगळवारी वणी मतदारसंघातील मारेगांव सह मांगरुड, कोलगाव, वेगाव, केगाव, गोधनी, मारेगाव शहर, करणवाडी, बुरांडा, हटवांजरी, भूरकीपोड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा प्राचार दौरा करण्यात आला. या दौऱ्यानिमित्त विविध मंदिर देवस्थान व वं.रा.तुकडोजी महाराज यांचे दर्शन घेतले व क्रांतिसूर्य बिरसामुंडा, वीर शामादादा कोलाम तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसान मोर्चा शंकर लालसरे, शिवसेना शिंदे गट तालुकाध्यक्ष विशाल किन्हेकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दयाल रोगे, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, शालीनीताई दारूंडे, गणपत वराटे, गणेश झाडे, पवन ढवस, लीलाधर काळे, अनूप महाकूलकर, वैभव पवार, राहूल राठोड, डोमाजी भादीकर, सुशीला भादीकर, दादाराव ढोबरे व महायुती चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आ. बोदकुरवार यांची प्रचारात आघाडी, मारेगाव तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आ. बोदकुरवार यांची प्रचारात आघाडी, मारेगाव तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on November 13, 2024 Rating: 5
Powered by Blogger.