टॉप बातम्या

14 नोव्हेंबर रोजी देरकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मतदार संघात प्रचार ताफा मुक्कामी येण्यासाठी अवघे काही दिवस उरलेत. विविध माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी वणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 

येथील वसंत जिनिंग लॉन मध्ये संध्याकाळी 6.30 वा. ही सभा होणार आहे. मा. आ. वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत ही सभा होत आहे. सभेला विदर्भातील सुप्रसिद्ध वक्ते व ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी, अरविंद देशमुख प्रांतीय अध्यक्ष विमाशी संघ, उत्तमराव गेडाम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
Previous Post Next Post