सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : ही निवडणूक केवळ आणि केवळ राज्यसह वणी मतदार संघाचा विकास, साधण्याबाबत अतिशय महत्वाचे आहे. या दहा वर्षात मतदार संघामध्ये खूप कामे केली.काही उर्वरित कामे, ती पूर्ण करायची आहे. आपल्या आशिर्वादामुळे तेही सुद्धा पूर्ण होणार आहे, त्यामुळे मी आपल्यासमोर भारतीय जनता पक्षाचा संकल्प पत्र "वचननामा" घेऊन आलो आहे. आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज (ता. 12) भाजप निवडणूक प्रचार कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दस सूत्री कार्यक्रमांची माहिती माध्यमातून दिली.
यावेळी उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार, यांच्या सह भाजप पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहीरनाम्याला गांभीर्याने घेणारा, त्यातील आश्वासनांची प्रत्यक्ष पूर्तता आणि दरवर्षी त्यावर सखोल आढावा घेणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष! महाराष्ट्राला सर्वात प्रगत आणि समृद्ध राज्य बनवण्याचा आमच्या वचनबद्धतेचा हा जाहीरनामा आहे. राज्याला दुष्काळमुक्त करणे, रोजगारनिर्मिती, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रत्येक कुटुंबाला निवारा आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करणे हे पक्षाचे ध्येय आहे. असे भारतीय जनता पक्षाच्या आज जाहीर केलेल्या संकल्प पत्र (वचननामा) याबाबत परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले. सोबतच वणी मतदार संघाकरिता दस सूत्री कार्यक्रम तयार असल्याचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यावेळी सांगितलं.
वणी विधानसभा मतदार संघाकरिता दहा सूत्री कार्यक्रमामध्ये समाविष्ट संकल्प खालीलप्रमाणे :
• वणी येथील शासकीय रुग्णालय आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज करणे.
• सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे अत्याधुनिकरण करणे
• वणी येथे अतिरिक्त एम.आय.डी.सी. निर्माण करणे. झरी तालुक्यात नवीन एम.आय.डी.सी. मारेगाव येथे मंजूर एमआयडीसी सुरू करणे.
• वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातील सर्व बाजारपेठांमध्ये सर्व पिकांना हमीभावाने शासनाचे खरेदी केंद्र उघडणे
• वणी येथील बसस्थानकाचे अद्ययावतीकरण करणे, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सुविधा करुन नविन बसेस सुरु करणे
• जनतेच्या सोयीसाठी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन येथे आधुनिक सुविधा उपलब्ध करणे.
• सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी सुविधा मार्गदर्शन कक्ष निर्माण करणे.
• भाजपच्या जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे, १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळविण्यासाठी व्यवसायांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र.
• वणी येथे सर्व शासकीय विभागाचे विभागीय व उपविभागीय कार्यालय उघडणे.
• वणी विधानसभा क्षेत्रात शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करणे.
याप्रसंगी पत्रकार बांधवांच्या प्रश्न उत्तराला जाताना दरम्यान आ. बोदकुरवार यांनी आग्रह करत, मोठ्या संख्येने बाहेर पडा, मतदान करा आणि भाजपा व महायुती सरकारबरोबर मजबूत, अधिक समृद्ध महाराष्ट्रासह वणीच्या विकासासाठी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
भाजप महायुतीच्या दस सूत्री कार्यक्रमाने वणी मतदार संघाला होणार फायदा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 12, 2024
Rating: