सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी विधानसभा मतदार संघात संजय खाडे यांच्या उमेदवारीमुळे या मतदार संघाच्या राजकीय वातावरणात नव्या उर्जेची लहर निर्माण झाली आहे. माजी सरपंच म्हणून आपला ठसा उमटवलेल्या संजय खाडे यांच्या समर्थकांमध्ये आता त्यांना आमदार म्हणून पाहण्याची उत्सुकता वाढत आहे. जनतेने त्यांना ‘आश्वासक चेहरा’ म्हणून स्वीकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून, त्यांच्या प्रचार रॅलींना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आज (ता.९ नोव्हें.) शिरपूर ते कैलास शिखर मंदिर परिसरातुन संजय खाडे यांच्या समर्थनार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या समर्थकांनी संजय खाडे यांच्याविषयी आपला विश्वास व्यक्त करत त्यांचे नेतृत्व वणी मतदार संघाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत मांडले. संजय खाडे यांची सरपंच म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.
माझा लढा आत्तापर्यंतचा, इथून पुढे कायम राहणार..!
• वणी येथे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी, संजय खाडे फाउंडेशन द्वारा संचलित महात्मा फुले अभ्यासिका सुरु करण्यात आली.
• कायमस्वरुपी चालत्या फिरत्या जनहित केंद्राद्वारे विविध समस्यांचे निवारण करून, अनेक सरकारी योजना सामान्य स्तरावरील माणसापर्यंत पोहोचवल्या गेल्या.
• वणी येथील रस्त्याच्या सुधारणेसाठी 'खड्ड्यात झाडे लावा' आंदोलन केले, त्याचाच परिणाम म्हणून एका आठवड्यात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.
• पूरग्रस्त शेतकऱ्यांचे रखडलेले नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
• युवकांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी Wani Creator Championship Program राबवण्यात आला.
• कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरच्यांना आधार देण्यात आला.
• शेती पिकाला हमीभाव मिळवून देण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक मोर्चे काढण्यात आले.
• शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मोफत प्रवेश मिळवून देण्यात आला.
• जंगली प्राण्यांच्या हैदोसामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्यात आली.
• नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्यांना आसरा मिळवून देण्यात आला.
• पूर परिस्थितीमध्ये विस्कळीत झालेले जीवन सुधरविण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला गेला.
या पार्श्वभूमीवर त्यांना आमदारपदी निवडून येण्यासाठी जनतेकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. समर्थकांच्या मते, सरपंच ते आमदार हा प्रवास संजय खाडे यांच्यासाठी नक्कीच यशस्वी होईल आणि ते वणी मतदार संघाच्या विकासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिण्यात यशस्वी ठरतील.
यावेळी संजय रामचंद्र खाडे यांनी कैलास शिखर मंदिरात जाऊन आपल्या विजयासाठी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली. समर्थकांच्या जयघोषात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यामुळे त्यांच्या विजयासाठीचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. या प्रचार रॅलीमुळे वणी विधानसभेत जनकैवारी संजय खाडे यांच्या उमेदवारीबद्दल एक आश्वासक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे.