मविआला झरीत मोठा फटाका: नांदेकर यांच्या समर्थनार्थ युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

झरी : नुकत्याच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी शिवसेना (उबाठा) गटाला गेल्याने कार्यकर्त्यामध्ये आनंद पसरला होता. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्राची उमेदवारी निष्ठावंत उमेदवारांना मिळणे अनिवार्य होते. परंतु वणी विधानसभा क्षेत्रामध्ये संजय दरेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली असल्याने अनेक शिवसैनिकांची मने दुखावल्या गेली. 

त्या उमेदवारीबद्दल नाराजीचे सूर ऐकायला मिळू लागले आहे. निष्ठावंत उमेदवारांना वगळून उमेदवारी दिली. त्यामुळे तडफदार युवा सेना तालुका प्रमुख श्री निलेश बेलेकार (कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, खडकी ग्रामपंचायत सदस्य) यांनी विश्वास नांदेकर, संभाजी राऊत झरी तालुका सरचिटणीस, राहुल राजूरकर युवा सेना उप तालुका प्रमुख, चेतन बाशेट्टीवार विभाग प्रमुख यांच्या समर्थनार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठविला आहे.

सदर निलेश बेलेकार यानी शाखा अधिकारी, विभाग अधिकारी, तालुका संघटक, तालुका युवा अधिकारी या पदावर काम केले होते. ग्रामपंचायत, कृ. ऊ. बा. समिती निवडणुका जिंकल्या. पक्षाच्या अनेक आंदोलनात सहभाग घेऊन पक्ष वाढविण्याकरता कार्य केले. झरी तालुक्यामध्ये तडफदार व धडाडीचे शिवसैनिक म्हणून त्यांनी आपली ओळख बनवली आहे. झरी तालुक्यामध्ये पक्ष वाढविण्याचे कार्य जोमाने केले. परंतु नुकत्याच विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रामध्ये संजय देरकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. या उमेदवारीबद्दल नाराजी असून, निष्ठावंत उमेदवारांना वगळून उमेदवारी दिली असल्याने युवा सेना प्रमुख निलेश बेलेकार सह संभाजी राऊत झरी तालुका सरचिटणीस, राहुल राजूरकर युवा सेना उप तालुका प्रमुख, चेतन बाशेट्टीवार विभाग प्रमुख यांनी सुध्दा पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र केला असून अखेर विश्वास नांदेकर यांचा समर्थनात झरी तालुक्यातील युवासेनेच्या पदाधिकार्यांनी राजीनामे दिले आहे.