टॉप बातम्या

आज वणीत तान्हा पोळ्याचे आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील समाजसेवी विजय चोरडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने आज ३ सप्टेंबर रोजी शहरातील नांदेपेरा रोड नगर परिषद शाळा क्र. ५ जवळ, तान्हा पोळा आयोजित करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे,या प्रसंगी बक्षीसांचा पाऊस पडणार असल्याचे तान्हा पोळा उत्सव समिती कडून म्हटलं जात आहे. यात भव्य "लकी ड्रॉ", प्रोत्साहन पर बक्षीस,टिफिन बॉक्स,असे असून एकूण पाच बक्षीसांचा भरघोस समावेश आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात विभागली गेली आहे.यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना उत्कृष्ट बक्षीस देण्यात येणार आहे. 

त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ४.३० वा. होणाऱ्या तान्हा पोळा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे, आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. 
Previous Post Next Post