टॉप बातम्या

मारेगावात पोलीस दलाकडून पथसंचलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील सण उत्सवाच्या काळात शांतता राखावी यासाठी शहरातील विविध भागातून आज पोलीस दलाकडून पथसंचलन काढण्यात आले.

गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पथसंचलन जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी यांच्या मार्गदर्शनात पथसंचलन करण्यात आले.
यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार व होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आयोजित उत्सव शांततेत पार पडावे यासाठी शहरातील मार्डी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गौसिया मस्जिद, मेन मार्केट, व शहरातील मिश्र वस्तीसह शहरातील रस्त्याने हा रूट मार्ट काढण्यात आला. यावेळी दलांना सण उत्सव बंदोबस्ताबाबत मार्गदर्शन करून योग्य त्या सुचना देण्यात आल्या.

यावेळी मारेगाव पोलीस स्टेशन मधील साहित्याची व्यवस्थित असल्याच्या संबंधाने खात्री करून घेण्यात आली.यामध्ये शस्त्र, दारुगोळा, भाललाठी, हेल्मेट इत्यादी साहित्य समावेश होता.या पथसंचलन मध्ये एक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, एकविस पोलीस अंमलदार, बावीस होमगार्ड यांचा समावेश होता. या रूट मार्टने शहरवासियांचे लक्ष वेधले होते.
Previous Post Next Post