सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील मार्डी ते हिवरा ह्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्त्यावर यामुळे अनेक छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. कोणतेही वाहन चालवताना रस्त्यातील खड्डे चुकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे एखादा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे या मार्गांवरील प्रवाशी संताप व्यक्त करू लागले आहेत.
मार्डी वरून हिवरा कडे येजा करण्यासाठी असलेला हा मुख्य रस्ता धोबे व बोढाले यांच्या बंडया जवळ रस्त्याची चाळण होऊन ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याचे शिवसेना माजी उप तालुका पुरुषोत्तम बुट्टे यांनी सांगितले तर, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागात मोडत असल्याने ग्रामपंचायत असो की जिल्हा परिषद याद्वारे या रस्त्याचे काम करता येत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संताप व्यक्त केला जात आहे.
तत्काळ मार्डी ते हिवरा रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे. अन्यथा गावाकऱ्यांना घेऊन भजन आंदोलन करण्यात येइल व संबंधित्यांचा भोंगळ कारभार रस्त्यावर आणू, तसेच हा रस्ता कधी मार्गी लागणार याबाबत त्यांनी संबंधितांना विचारणा केली असल्याचेही पुरुषोत्तम बुट्टे यांनी 'सह्याद्री चौफेर'ला बोलताना सांगितले आहे.
त्यामुळे मार्डी ते हिवरा या दुरावस्था झालेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागतोय का? याकडे परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मार्डी ते हिवरा रस्त्याची दयनीय अवस्था
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 26, 2024
Rating: