सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा बोटोणी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 07.08.24 ते 09.08.2024 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 07.08.2024 रोजी वकृत्व स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा विषय आदिवासी समाजातील थोर समाज सुधारक या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी वडदे हिने इंग्रजीतून भाषण केले. काही विद्यार्थ्यांनी मराठीतून व काही विद्यार्थ्यांनी हिंदीतून भाषण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या शाळेचे प्राचार्य एन .डी .भिवगडे हे होते. प्रमुख अतिथी श्री प्रा. डी.आय.लढे हे होते. या स्पर्धेकरिता श्रीमती भेंडारे मा. शि. श्री. पि.आर.शिंदे मा. शि. श्री व्ही.ए .पवार मा. शि., श्री एस.जी खोबरकर मा.शि.प्रा.आर.जी बोडे,प्रा.गणेश अक्कलवार , कुमारी संध्या तुरारे प्रा.शिक्षिका, श्रीमती आय.डी.महाकुलकर प.प्रा. शि. इत्यादींनी या स्पर्धेकरिता मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री एम ए मुद्देलवार आभार प्रदर्शन प्रा.श्री वाय एम केने यांनी मानले.
दिनांक 08.08.2024 रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भारतातील थोर समाज सुधारक या विषयावर इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले. या स्पर्धेकरिता श्री. व्ही ए पवार माध्यमिक शिक्षक, श्री. राहुल आत्राम प्रा. शि, निकेश जाधव, डी.आय.लढे, श्री.आर जी बोडे, श्री. एस.जी. खोबरकर इत्यादींनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये तीन गट करण्यात आले होते, माध्यमिक विभाग,प्राथमिक विभाग कनिष्ठ महाविद्यालय विभाग, प्रत्येक विभागातील दोन विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.
त्यानंतर इयत्ता सहावी ते बारावीतील विद्यार्थ्याकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते चित्रकला स्पर्धेचा विषय आदिवासी समाजातील थोर साहित्य व चित्र यावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्र काढले. चित्रकला स्पर्धेकरिता आय.डी .महाकुलकर, श्रीमती सरकटे, कुमारी मोना, श्री निकेश जाधव, श्री. आत्राम, श्री. भोयर यांनी परिश्रम घेतले.
त्याचवेळी दुसऱ्या वर्ग खोलीमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या रांगोळी काढून त्या ठिकाणी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. रांगोळी स्पर्धेकरिता कु. संध्या तुरारे, कु.गेडाम अधीक्षिका, कुमारी मोना पाटील मॅडम व इतर कर्मचाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली.
दिनांक 9 ऑगस्ट 2024 जागतिक आदिवासी दिनानिमित्त गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला व प्रभात फेरी उत्कृष्टपणे पार पाडली. प्रभात फेरी करिता श्री. मनोज गडदे अधीक्षक यांनी बँड पथक व डफडा पथक यांचे योग्य नियोजन केले होते.
त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्री.एन डी भिवगडे, श्री.सुनील जी गेडाम माजी जिल्हा परिषद सदस्य बोटोणी, श्री. तुळशीराम कुमरे सरपंच सराटी, श्री.मंगेश भाऊ ऊईके सदस्य ग्रामपंचायत बोटोणी यांनी चित्रकला स्पर्धा व रांगोळी स्पर्धा या प्रदर्शनीचे रीतसर उद्घाटन केले.
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त शाळेच्या सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, व प्रमुख अतिथी यांनी क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले त्यानंतर शाळेतील विद्यार्थी मुले व मुली यांनी आदिवासी नृत्य, ढेमसा नृत्य, इतर नृत्य प्रकार यावर आपल्या कलेचे प्रदर्शन केले. श्री वाय एम केणे यांनी सुंदर गीत गायन केले, श्री राहुल आत्राम यांनी सुंदर गीत गायन केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गणेश अक्कलवार तर आभार प्रदर्शन श्री डी.आय लढे यांनी मानले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. याकरिता वसतीगृहाचे अधीक्षक श्री मनोज गडदे आणि अधीक्षिका कुमारी गेडाम यांनी उत्कृष्ट नियोजन केले. या जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी आयोजित करण्यात आली होती.