सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी शहरामध्ये दरवर्षी आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलागुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा "जागतीक आदिवासी गौरव दिवस" म्हणून घोषीत केला. संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे. या शुभ दिनाचे औचित्य साधुन जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो.
या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो. वणी तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी समाज सन्मान कृती समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला. वणी शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटारसायकल रॅली व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात भीमालपेन देवस्थान मंदिर पाण्याची टाकी, येथून मार्ग क्रमण करत टिळक चौक, बसस्टॉप, जिजामाता चौक, परत टिळक चौक एल.टी. कॉलेज चौक,परत टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, टागौर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम भीमालपेन देवस्थान येथे झाली. क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, व शामादादा कोलाम यांच्या जय घोषाने वणी शहर दुमदुमले.
यावेळी अशोक राजगडकर, पुष्पाताई आत्राम, गीत घोष, सुभाष आडे, रामदा गेडाम, वसंतराव चांदेकर, उत्तम गेडाम, अॅड अरविंद सिडाम, संतोष चांदेकर, रमेश मडावी, शंकर किनाके, विकास पंधरे, महेश आत्राम, भाऊराव आत्राम, श्रीकृष्ण मडावी, जगदीश मेश्राम, प्रशांत डोनेकर, भगवान आत्राम, मारोती आत्राम, सुभाष चांदेकर, सोनू पेंदोर, रमेश मडावी, सुमित गेडाम, नरेंद्र उईके, सचिन मेश्राम, रानु तुमराम, सुनील गेडाम सर, विद्याधर कोरवते सर,भारती पेंदोर, पेन्दोर ताई, जोती ताई, उईके, मडावी ताईसह हजारोंच्या संख्येने बांधव, महिला व युवकांसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.