सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
यवतमाळ : जिल्हा पोलिस दलात अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार आपल्याला मिळावा अशी अपेक्षा अनेकांची असते. यासाठीच येथे नियुक्ती मिळविण्याकरिता मोठी स्पर्धा चालते.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेसाठी दोन पोलिस निरीक्षकांमध्ये तीव्र स्पर्धा पहायला मिळाली. यात अवधूतवाडीचे पूर्व ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांनी बाजी मारली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या आदेशावरून त्यांची एलसीबीत नियुक्ती झाली.