सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरातील शास्त्री नगर येथील गाढ झोपेत असलेल्या बाप-लेका'ला विषारी सापाने दंश केल्याची घटना दि. 24 जुलैच्या पहाटे 2 च्या दरम्यान घडली, यात एक वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. तर वडीलावर उपचार सुरू आहे. दक्षित सुमित नेलावार असे,मृत पावलेल्या बालकाचे नाव असून वडीलांची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राप्त माहितीनुसार शास्त्री नगर मोक्षधाम जवळील परिसरात राहत असलेले नेलावार परिवार 24 जुलैला गाढ झोपेत असताना पहाटे 2 वाजताच्या दरम्यान, वडील सुमित नेलावार (अंदाजे वय ३५), मुलगा दक्षित सुमित नेलावार (अंदाजे वय 1 वर्ष) यांच्यासह दक्षितची आई व बहीण हे आपल्या घरातच झोपलेले होते. यादरम्यान वडील सुमित आणि एक वर्षाचा दक्षित च्या अंथरुणात विषारी साप शिरून त्या दोघांना दंश केल्याने चिमुरडा रडू लागला अन वडीलासह संपूर्ण परिवाराला जाग आली.
त्याच वेळी वडील सुमित व चिमुरड्याला सर्पदंश झाल्याचे लक्षात आले. दरम्यान त्यांना तातडीने वणीतील रुग्णालयात दाखल केले गेले,परंतु त्या दोघांनाही चंद्रपुर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. दरम्यान, चिमुरड्याचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असुन, वडील सुमित नेलावार यांचीही प्रकृती चिंताजनक असुन त्यांचेवर चंद्रपुर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून चिमुकल्याच्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
चिमुरड्या सह वडीलाला विषारी सापाचा दंश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 25, 2024
Rating: