थातूर-मातुर होत असलेल्या "त्या" रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला "ब्लॅक लिस्ट" मध्ये टाका - सीमा स्वामी (लोहराळकर)
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
नांदेड : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत हिमायतनगर पळसपूर डोल्लारी अंतर्गत सदर रस्त्याचे निकृष्ट काम व त्यात होत असलेली दिरंगाई यामुळे या मार्गांवरील प्रवास करणारे वाट सरू यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या, संबंधित ठेकेदार व बांधकाम विभाग चिरीमिरी करून दुर्लक्ष करत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यां तथा भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य मराठवाडा कार्याध्यक्ष सिमा स्वामी (लोहराळकर) यांनी निवेदनातून त्या कामाची चौकशी करून दोषी संबंधित कंत्राटदाराला "ब्लॅक लिस्ट" मध्ये टाकण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद असे की, हिमायतनगर ते पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली या अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत कोट्यावधी रूपयांचा विकास निधी मंजूर झाला. जवळपास दोन जवळपास दोन वर्षांचा कार्यकाळ संपला मात्र,या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. औरंगाबाद स्थित सिद्दीकी या ठेकेदाराने थातूर मातुर काम केले, कामाचा अवधी संपुष्टात येवून ही काम पुर्णत्वास आले नाही. ठेकेदाराने या विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता व तसेच कार्यकारी अभियंत्यात चिरीमिरी करून सुधारीत मुल्यांकन करून निधी हडप केला. मात्र, कामाची अवस्था 'जैसे थे' असल्याने नागरिकांना मोठ्याप्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी नागरिकांतून संतापजनक मत व्यक्त होत असल्याने संबंधित ठेकेदाराकडून परवाच या अंतर्गत रस्त्याचे काम हिमायतनगर कडून सुरूवात झाली आहे. पहिल्या उखडलेल्या रस्त्यावर सोलींग अंथरून त्यावर मुरूमाच्या नावाखाली माती टाकण्याचे काम सुरू असून, पाऊस पडल्यानंतर नमूद रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार सिद्दीकी (औरंगाबाद) यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, असे जनआक्रोश च्या मराठवाडा कार्याध्यक्षा सिमा स्वामी लोहराळकर यांच्या नेतृत्वात मागणी करण्यात आली आहे. जर चौकशीत दिरंगाई झाल्यास प्रशासनाच्या विरोधात उपोषण करण्यात येइल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर सिमा स्वामी लोहराळकर यांच्या सह नागोराव पळसपुरकर यांची स्वाक्षरी आहेत.
थातूर-मातुर होत असलेल्या "त्या" रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदाराला "ब्लॅक लिस्ट" मध्ये टाका - सीमा स्वामी (लोहराळकर)
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2024
Rating: