काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपोषण मंडपास भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 2021-22 या वषार्तील मातोश्री ग्राम समृध्द शेत पांदण रस्ता (भालेवाडी) मंजुर असलेल्या कामा संदर्भात वारंवार निवेदन देण्यात आले. परंतु अद्याप त्यावर कुठल्याही स्वरुपाची कार्यवाही न झाल्याने तालुक्यातील पाथरी येथील त्रस्त शेतकऱ्यांनी काल मंगळवार 23 जूनला  सुधाकर बोढे यांच्या शेतासमोर उपोषण सुरु केले आहे.या उपोषण मंडपास वसंत जिनींग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे सह काँग्रेस चे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, माजी महिला बाल कल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, अंकुश माफूर, यांनी भेट दिली. 
 
तालुक्यात सध्या दोन तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू असून पावसाळ्याचे दिवस आहे. आजच्या घडीला शेतीचे कामाकरीता ये-जा करण्याचा मार्ग या ठिकाणी बंद पडला आहेत. चार दिवसात रस्त्याची पर्यायी व्यवस्था आपल्या विभागाकडुन करुन देण्यात यावी तसेच प्रलंबीत मंजुर पांदण रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावावे. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र दुर्लक्षित होत असल्यामुळे काल मंगळवार दि.23 जुलै 2024 पासून उपोषणास पाथरी येथील त्रस्त शेतकऱ्यांनी सुरुवात केली. 

उपोषणकर्तेमध्ये यावेळी रसिका दरवे, अस्मिता चेंडे, संगीता वैरागडे, भाग्यश्री वैरागडे, अंजली दरवे, हरिदास कापसे, सतीश पाल, बेबी कापसे, मोरेश्वर चेंडे, वंदना मत्ते, संजय दरवे, अविनाश कुमरे, गोवर्धन तोडासे उपोषणास बसले आहेत.
 
या भेटी दरम्यान इतरही समस्या प्रलंबित आहे. त्या वसंत जिनींग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, ता.मारोती गौरकार, माजी सभापती अरुणाताई खंडाळकर यांनी उपोषण मंडपात भेट देऊन जाणून घेतल्या आणि चर्चा केली. यावेळी उपस्थित पक्षाचे ता. अध्यक्ष मारोती गौरकार, सरचिटणीस प्रा. शैलेश आत्राम, सभापती गौरीशंकर खुराणा, संचालक अंकुश माफूर, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
  
काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपोषण मंडपास भेट काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपोषण मंडपास भेट Reviewed by सह्याद्री चौफेर on July 24, 2024 Rating: 5
Powered by Blogger.