सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
यावेळी घनश्याम पावडे (वणी तालुका अध्यक्ष), संध्या बोबडे महिला जिल्हाध्यक्ष), मारोती गौरकार (मारेगाव तालुका अध्यक्ष), श्यामा तोटावार (महिला शहराध्यक्ष), अंकुश माफूर (संचालक), माजी नगराध्यक्षा शालिनी रासेकर, प्रा.शैलेश आत्राम (ता.सरचिटणीस), राहुल दांडेकर (विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस), अशोक पांडे (प्रभारी शहराध्यक्ष), ओम ठाकूर हे उपस्थित होते.
पुढे पत्रकारांशी संवाद साधताना आशिष खुलसंगे यांनी सांगितलं की, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या यात्रेचा आरंभ होऊन, ही यात्रा वणी, मारेगांव व झरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधणार आहे. शेतकरी तसेच सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून, त्या शासन दरबारी उचलून, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न, ह्या यात्रेव्दारे केला जाणार आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनाने ही यात्रा होणार आहे. कमिटीने माझ्या खांद्यावर जबाबदारी सोपवली असून पक्षाचे तीनही तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश असणार आहे.
असे असेल यात्रेचे स्वरूप :
शेतकरी न्याय यात्रेला मारेगांव (जनामाय कासामाय मंदिर) पासून सुरूवात होणार आहे. संपूर्ण मारेगांव तालुक्याचा दौरा केल्यानंतर ही यात्रा झरी तालुक्यात प्रवेश करेल आणि झरी दौरा झाल्यावर, यात्रा वणी तालुक्यात येईल. यात्रेचा समारोप वणी येथे होईल. यात्रेदरम्यान दर दिवशी शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, महिला, युवक यांच्याशी संवाद साधाला जाईल.
प्रमूख मागण्या :
१. सरसकट व १०० टक्के शेतकरी कर्जमाफी करावी (तेलंगाना राज्याच्या धरतीवर), २. स्वामीनाथन आयोग लागू करावा. शेतमालाला खर्चानुरूप बाजारभाव व हमीभाव मिळावेत व हमीभावाला कायद्याचे रूप मिळावे, ३. कृषि उपयोगी शेती अवजारांवरील जि.एस.टी (GST) संपूर्णपणे रद्द करावी, ४. वणी विधानसभा क्षेत्रातील पिकविमा व ओला दुष्काळपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहिर करावी, ५. कृषि पंपाचे वीज बील संपूर्णतः माफ करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा मिळावा, ६. वन्य प्राण्यांमुळे होत असलेले शेतीचे नुकसान बघता शेतकऱ्यांना काटेरी तार कंपाऊंड १०० टक्के अनुदान (subsidy) मध्ये देण्यात यावे, ७. तिन्ही तालुक्यांत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह सुरू करावे, ८. वणी व झरी तालुक्यातील ८० टक्के कंपनीत स्थानिकांना रोजगार द्यावा, ९. मारेगांव व झरी येथे तत्काळ बस स्थानक करावे, १०. मारेगांव व झरी तालुक्यात क्रिडा संकूलाचे काम त्वरीत सुरू करावे, ११. मारेगांव एम.आय.डि.सीचा प्रश्न तातडीने सोडवावा, १२. दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर आळा घालण्यासाठी वणी शहर व वेकोली अंतर्गत गावांमध्ये शुद पाणी पुरवठा करावा, १३.वणी मधून मिळणारा कोळसा, सिमेंट, चुना ह्यांच्यातून येणारा खनीज विकास निधी, पूर्ण जिल्ह्याकरिता न वापरता, केवळ वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी वापरावा,
१४. वणी-मुकुटबन रस्ता, नांदेपारा-मार्डी रस्ता, चारगांव चौकी-शिरपूर कळमना, आबई फाटा-ढाकोरी बोरी, करोडो रूपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांची, संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जी आणि बेजबाबदारपणामुळे, एका वर्षात दुरावस्था होऊन, रस्ते पाण्याखाली गेले. ह्याची चौकशी करून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व उच्चस्तरीय चौकशी व्हावी, १५. वणी शहरातील अविकसीत वस्त्यांमध्ये विकास कामे व्हावीत, १६. वणी विधानसभा क्षेत्रात उपजिल्हा रूग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे, १७. वणी शहरात करोडो रूपये खर्च करून, बांधलेले सांस्कृतिक भवन जनतेसाठी खुले करावे, १८. आदिवासी बांधवांना त्यांचा 'वन हक्क' मिळावा आणि २०२५ नंतरच्या शेती करणाऱ्या आदिवासींना वन जमीन पट्टी देण्यात यावी, १९. वणी विधानसभा क्षेत्रात लाखो रूपये खर्च करून केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामांची चौकशी व्हावी, २०. गावागावांत बंद असलेल्या वॉटर फिल्टर प्लांटची चौकशी व्हावी, २१. शहर व गावांतील प्रदूषणावर तोडगा काढावा, २२. ए.एन.एम व जी.एन.एम यांना वाढती महागाई बघता पगारवाढ करण्यात यावी, २३. पोलिस पाटलांचे रखडलेले वेतन त्वरीत देण्यात यावेत, २४. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले मानधन त्वरीत देण्यात यावे व शासकीय काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना पर्मनन्ट करावे.
"वणी मारेगाव झरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी, मागसवर्गीय, युवक, आशा वर्कर, मच्छीमार, व्यावसायिक इत्यादींच्या समस्यांवर तोडगा काढावा. ह्याकरिता "शेतकरी न्याय यात्रा" लवकरच काढण्यात येणार आहे असं वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे यांनी सांगितले".
आत्महत्याग्रस्त तालुक्यातून होणार काँग्रेस'च्या 'शेतकरी न्याय यात्रे'ला प्रारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 24, 2024
Rating: