सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
रमेश सुर्यभान बोकडे (42) , रा. वेगांव असे निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप तरी अस्पष्ट असून मृतकाच्या नावे तीन एकर शेती असल्याचे समजते. या दुःखद घटनेची मारेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मृतकाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 23, 2024
Rating: