सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : मनुष्याने स्वतःच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. मात्र, समाजातील ईतर दुर्बल समाजाच्या व्यथांची जाणीव राखून त्यांच्या समस्या व मूलभूत सोयींकरिता सदैव प्रयत्नशील असावे. एक जबाबदार नागरिक म्हणून राजकीय,सामाजिक कार्य करित असताना समाजातील अंध आणि दृष्टीहीनासाठी दृष्टी देऊन त्यांच्या जगण्याला पंख देणे हेच खरे लोकप्रतिनिधित्व किंबहुना सामाजिक उत्तरदायित्व होय,असे प्रतिपादन स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन चे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी केले. ते स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन, वणी तर्फे आयोजित जैताई मंदिर येथील मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप वर आरोग्य तपासणी शिबीरात बोलत होते.
आयोजित शिबिर कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ. चौधरी, राहुल मुंजेकर (औषधी विभाग), बजरंग दलचे जिल्हा संयोजक विशाल दुधबळे, श्री.जोशी, श्री. मुन्ना तुगनायत, श्री. माधवजी सरपटवार हे उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी राजकारणात तर आहेच, पण शेवटी राजकारणात असले तरी जन सेवा, हे माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून मी सतत असे सामाजिक, जनहितार्थ उपक्रम राबवत असतो, त्यासाठी तुम्ही सहभागी होऊन यशस्वी करता हे मी माझं भाग्य समजतो, यासाठी तुम्हा मायबापांचे धन्यवाद...तुमचा आशीर्वाद सतत पाठीशी राहूद्या, असेच कार्य पुढेही सुरू राहील. अशी ग्वाही दिली.
शिबिरामध्ये जवळपास 900 रुग्णांनी लाभ घेतला असून यात बीपी, शुगर, हृदय, डोळे तपासून घेतले आहे. तसेच शेकडोच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले. या मोफत शिबिराला यशस्वीरित्या चोरडिया हॉस्पिटल, वणी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी पार पाडले. यावेळी विजय चोरडिया मित्र परिवार तथा वणी विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंध आणि दृष्टीहीनासाठी काम करणं हेच खरे लोकप्रतिनिधित्व - अध्यक्ष विजय चोरडिया
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2024
Rating: