सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : तालुक्यातील मोहदा, केशवनगर ते वेळाबाई फाटा, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा अशी मागणी येथील गावकऱ्यांनी 12 जुलै रोजी निवेदनातून केली होती. मात्र, संबंधित विभागाने दुर्लक्ष करत केराची टोपली दाखवल्याने आम्हाला आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत प्रशासनाच्या विरोधात सोमवार दि.29 जुलै'ला "चक्का जाम आंदोलन" करण्यात येणार आहे. अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना पुन्हा देण्यात आले.
मोहदा,केशवनगर ते वेळाबाई फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत अनेकदा निवेदन दिली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता मोहदा,केशवनगर, वेळाबाई व या परिसरातील सर्व गावकरी आक्रमक झाली आहे. त्यांनी वेळाबाई फाट्यावर चक्काजाम आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. मा.जिल्हाधिकारी, विद्यमान आमदार वणी, पोलीस स्टेशन शिरपूर, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी यांना माहितीस्तव निवेदन सादर करण्यात आले असून आम्ही रस्त्यावर उतरून "चक्का जाम आंदोलन" करू असा पुन्हा ईशारा देण्यात आला आहे. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासनाची जबाबदारी असेही निवेदनात नमूद केलं आहे. यावेळी तीनही गावातील प्रमुख पदाधिकारी वर ग्रामस्थ उपस्थित होते.
वणी तालुक्यातील मोहदा,केशवनगर ते वेळाबाई मार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. गाडी व पायदळ चालणे सुद्धा कठीण झालेले आहे. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असून दैनंदिन कामकाजाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर वेळाबाई बस स्टॉप समोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.असे आमच्या प्रतिनिधीला निवेदनकर्त्यांनी सांगितले.
परवा वेळाबाई फाट्यावर "चक्का जाम आंदोलन"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2024
Rating: