अवैध रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वाळू तस्करी वर महसूल विभागची करडी नजर ठेवून असूनही तालुक्यात चोरट्या मार्गाने रेतीची तस्करी सुरूच असल्याचे पोलिसांच्या धडक कारवाईने पुन्हा उघड झाले आहे.
बुधवारी 12 जून रोजी पेट्रोलिंग करीत असतांना स.पो.नी. माधव शिंदे ठाणेदार, यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरुन शिरपुर पो.स्टे. हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना येथील पोउपनि/रावसाहेब बुधवत व पोस्टॉप पोहवा गंगाधर घोडाम, नापोकों/गजानन सावसाकडे यांनी आरोपी नामे सतीष देवीदास काकडे (32) वर्षे रा. ढाकोरी ता.वणी जि. यवतमाळ हा त्याचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (MH 29,BC-4173) या ट्रॅक्टरच्या ट्राली मध्ये अंदाजे 1 ब्रास कि.अं 4000/-रु.चा मुद्देमाल विना परवाना बेकायदेशीर रित्या गौण खनिज (रेती) उत्खनन करुन वाहतुक करतांना मिळुन आला. 
      
सदर वाहनचालकांच्या ताब्यातुन लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (MH 29,BC-4173), ट्रालीसह कि.अं. 5,00,000/रु.व 1 ब्रास रेती कि.अं. 4000/-रु.असा एकुण 5,04,000/-रु.चा मुद्देमाल ताब्यात घेउन जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी विरुध्द कलम 379 भा.द.वी. सहकलम पर्यावरण संरक्षण अधिनियम 15, सहकलम महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 48 (7) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    
सदरची कारवाई मा.डॉ. पवन बन्सोड पोलीस अधिक्षक साहेब, यवतमाळ, श्री. पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, श्री. गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे शिरपुर यवतमाळ येथील सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोउपनि/रावसाहेब बुधवत, पोहवा/गंगाधर घोडाम नापोकों/गजानन सावसाकडे यांनी पार पाडली.