सरकीच्या ढिगाऱ्यात अवघ्या दहा वर्षाच्या मुलीचा आढळला मृतदेह

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अवघ्या दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह चक्क सरकीच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने घातपात तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात असून ही घटना एमआयडीसी मधील स्वस्तीक ऑइल मिल मध्ये रात्री 10 वाजता च्या दरम्यान उघडकीस आली. 

मृतक ओमवती तानसिंग धुर्वे, असे ढिगाऱ्याखाली आढळून आलेल्या मुलीचे नाव आहे. मुलीची आई स्वस्तीक ऑइल मिल मध्ये कामाला असुन पती, तिन मुली व एक मुलगा असे हे कुटुंब मिल मधील निवाऱ्यात वास्तव्यास आहेत.

ओमवती वास्तव्यास असलेल्या निवाऱ्यातून अचानक गायब झाल्याने तीचा शोध घेत असतांना 11 मे च्या रात्री 10 वाजताच्या दरम्यान कापसाच्या सरकीच्या ढिगाऱ्यात मृतदेह आढळून आल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे. 

घटनेची वणी पोलीसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता ग्रामिण रूग्णालय येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
Previous Post Next Post