मारेगाव : अत्याधुनिक सुविधायुक्त लोढा हॉस्पिटलचे उदघाटन आज शनिवारी सकाळी 11 वाजता श्री. अमरचंद लोढा, श्री. खुशालचंद ओस्तवाल, श्री. प्रकाशचंद कोचर यांचे हस्ते संपन्न होणार आहेत.
यवतमाळ रोड राज्यमार्गावरील स्थित या "लोढा हॉस्पिटल" मारेगाव मध्ये मेडिकल पासून अद्यावत सुविधा उपलब्ध असणार आहे. यामध्ये वैद्यकीय तज्ञ् जनरल फिजिशन म्हणून डॉ. राजेंद्र लोढा, प्रसूती स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. महेंद्र लोढा, मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रोहीत चोरडिया, अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.सुबोध अग्रवाल, बालरोग तज्ज्ञ डॉ.पवन राणे, नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.स्वप्नील गोहोकार, दंत रोग तज्ज्ञ डॉ. अमोल पदलमवार, शस्रचिकित्सा तज्ज्ञ डॉ. अक्षय खंडाळकर हे उपचार पद्धती करतील.
आजपासून आरोग्य सेवत सज्ज असलेल्या व उदघाटन समारंभ प्रसंगी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या खासगी लोढा हॉस्पिटल मध्ये लाभ घेण्याचे आवाहन डॉ. राजेंद्र लोढा, डॉ. महेंद्र लोढा, दुष्यन्त जयस्वाल, अंकुश माफूर यांनी केले आहे.