टॉप बातम्या

धक्कादायक..जिवंत तारेचा स्पर्श होताच तरुण कामगाराचा मृत्यू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये मिस्त्री चे काम करत असताना एका 32 वर्षीय विवाहित कामगारांचा हाय होल्टेज च्या विद्युत प्रवाहाशी संपर्क आल्याने मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दि.23 डिसेंबर ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (वय 32) रा. मांगरुळ असे मृतकाचे नाव आहे. वाहिद शेख यांचे घरी संडास आणि बाथरूम चा स्लॅब टाकण्यासाठी काही मजूर कार्यरत होते.त्यात प्रफुल्ल हा संडास वर सळाख टाकत असतांना वरती असलेल्या 11 केव्हीच्या विद्युत पुरवठा होत असलेल्या जिवंत तारांना स्पर्श होताच विजेचा धक्का लागून प्रफुल्ल याला झटका लागला. दरम्यान, त्याला ताबडतोब मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी अंती प्रफुल यास मृत घोषित करण्यात आले.

मृतक प्रफुल याच्या पाठीमागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.घरावरील जिवंत विद्युत तारा प्रफुल च्या आयुष्याच्या कर्दनकाळ ठरला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Previous Post Next Post