Page

संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त ब्लँकेट व फळ वाटप


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज 19 डिसेंबर 2023 ला संत गाडगेबाबा महाराज यांच्या 67 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहरातील उघड्या वर जीवन जगणारे अशा निराधार लोकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लॅंकेटचे वाटप नगर सेवा समितीच्या वतीने रात्री करण्यात आले.
शहरातील नांदेपेरा रोड वरील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समोरील इमारती पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान संपूर्ण शहरात फिरून, बस स्टँड परिसर, शिवतीर्थ, नगरपरिषद कॉम्प्लेक्स परिसर, महावीर भवन, गांधी चौक परिसर, रंगनाथ स्वामी मंदिर परिसर, हनुमान मंदिर परिसर व ग्रामीण रुग्णालयात अनेक रुग्णांना व गरजवंतांना गरम कपड्याचे ब्लॅंकेटचे वितरण वणीचे सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर विजयबाबू चोरडिया यांच्या सौजन्याने करण्यात आले.
मागील बारा वर्षापासून दर रविवारी स्वच्छता अभियान, ब्लॅंकेट, अपंग लोकांना काठी, तर संपूर्ण शहरांमध्ये झाडे लावणे असे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असते. आज अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागृकता निर्माण करणारे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर सेवा समितीचे आज पहाटे ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान. समितीचे अध्यक्ष नामदेवराव शेलवडे, दिलीप कोरपेनवार, दिनकरराव ढवस, राज तूराणकर,प्रदीप मुके, विकास जयपुरकर, भास्कर पत्रकार, नितीन बिहारी उपस्थित होते.
फळ वाटप..
डॉक्टर महेंद्र सुलभेवार, डॉक्टर कमलाकर पोहे, डॉक्टर विवेक गोखले, डॉक्टर कोल्हे मॅडम, राजू तुराणकर, शेखर चिंचोलकर, राहुल चौधरी, संजय चिंचोलकर, प्रदीप मुके, नितीन बिहारी, कैलास बोबडे, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, ज्ञानेश्वर भोंगळे, अजय चिंचोलकर, अरविंद क्षीरसागर, कवडू दुरुटकर, वामन बोबडे, उपस्थित होते.