संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी व कानडा ग्रामपंचायत विजयाची 1 वर्ष पूर्ण या निमित्ताने ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभीवादन करण्यात आले. 
बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेत ग्रामवाशियांनी आज 20 डिसेंबर 2023 ला संत गाडगेबाबा पुण्यतिथी व कानडा ग्रामपंचायत विजयाची 1 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण, या निमित्त ग्राम स्वच्छता अभियान सरपंचा सुषमा रुपेश ढोके यांच्या उपस्थितीत हे अभियान राबविण्यात आलं.
यावेळी सरपंचा सूषमाताई ढोके उपसरपंच किशोर मंदे, माजी सरपंच प्रमोद धोबे, निलेश ढोके, सूरज येवले, गजानन दर्वे, नगाजी दर्वे, राजू बावणे, लहू येवले, रोशन, रूपेश ढोके, हरीचंद्र डाहूले, सचिन पानघाटे राजू आस्कर, रविंद्र येवले यांच्या सह समस्त ग्रामवासी सहभागी झाले होते.