टॉप बातम्या

ग्रामपंचायत परिचालकांचे 'वर्क' तालुक्याच्या ठिकाणी नको

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये ऑनलाईन शासनाचे कामे करण्यासाठी ग्रामपंचायत परिचालक नेमले आहेत. मात्र, काही परिचालक ते नेमलेल्या ठिकाणी काम करण्याऐवजी तहसीलच्या ठिकाणी बस्थान मांडून असल्याने ग्रामस्थांना छोट्या छोट्या कामासाठी तहसील मुख्यालयात जावे लागते. ज्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये. यासाठी सेतू केंद्र धारकाने आपले सेवा केंद्र ग्रामपंचायत कार्यालयातच सुरू करण्यात यावे अशा आशयचे निवेदन तहसीलदार उत्तम निलावाड यांना देण्यात आले आहे.

मारेगाव तालुक्यामधील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार नावाचे संगणक केंद्र सुरू करण्यात आले. या संगणक चालकांनी काही दिवस ग्रामपंचायत स्तरावर काम केले आणि नंतर स्वतःच्या फायद्या साठी तालुक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर सुरु केले, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा मोठा फटका बसत असून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांची अडचण होत आहे. त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी काम करणे बंधनकारक असताना ते त्या ठिकाणी करत नसल्याचे तक्रार जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी, वणी, जिल्हा समन्वयक (mahait) यांना सुद्धा माहितीस्तव दिल्याचे निवेदनात नमूद केलं आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत परीचालकांनी ज्या ग्रामपंचायत कार्यालयात नेमून दिलेल्या त्याच ग्रामपंचायत कार्यालयात कामे करावी व संबंधित काहींनी तालुक्याच्या ठिकाणी स्वतः ची खासगी सेतू केंद्र सुरु केलीत, अशा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेतू सुविधा संचालक आशिष पेचे, संजय नवलखा, अतुल बोबडे, धनंजय आसुटकर, आशिष येरणे, यांनी तहसीलदार यांना केली आहे.


Previous Post Next Post