सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : विमलाबाई पांडुरंग दारूंडे (वय ७५) यांचे मंगळवारी (ता. १९) सकाळी पाच वाजताच्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. वंचित बहुजन आघाडी मारेगाव तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्यावर कान्हाळगाव येथील स्मशानभूमीत आज दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवरतीयांनी माहिती दिली. त्यांच्या पाठीमागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.