सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील कोलगाव येथील तरुणाने शेतातील एका झाडाला गळफास घेत आपली घटना आज सकाळी 10 वाजता उघडीस आली.
प्रदीप उर्फ शालिक नानाजी अवताडे (39) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे. वडिलांकडे असलेल्या शेतीसह इतरत्र मजुरी करून आपल्या परिवाराचे गुजरान करायचा. शालिक हा नेहमीप्रमाणे कोलगाव शिवारात असलेल्या शेतात गेला आणि झाडाला फाशी चा फंदा लावलेल्या अवस्थेत काहींना दिसून आला. ही बातमी नातेवाईक यांना कळताच दुःखाचे डोंगर कोसळले.
शालिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदीपच्या आत्महत्येचे नेमके कारण गुलदस्त्यात असून त्याच्या पाठीमागे वडील, आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.