Top News

तरुणांई मध्ये गांजा ओढण्याची वाढतेय क्रेज


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सध्या शहरातील तरुणांमध्ये गांजा ओढण्याचा क्रेज झपाट्याने वाढत आहे. शहरालगत असलेल्या निर्जन ठिकाणी, मोकळ्या ले-आऊटमध्ये जसं जमेल तसं म्हणत हे नवयुवक तरुण गांजा फुकत आहेत. त्यामुळे जोश मे होश अर्ध्या हरकंडात पिवळे झालेले गमावून बसत आहे.
शंभर रुपये किमतीचा गांजा विकत घेतात, हातावर रगडतात आणि सिगारेटमध्ये भरून दम मारो दम भरतात. हे नशेचे व्यसनी सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत दुचाकीवरून शहरात गस्त घालताना दिसतात. मारेगावात गांजाची ही खेप पांढरकवडा, यवतमाळ आणि जिल्ह्याच्या सीमा लगत च्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथून दाखल होत असल्याचे बोलल्या जात आहे.
शहरासह ग्रामीण भागामधून ही विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समजते. त्यामुळे अल्पवयीन सह तरुणांना गांजा मिळणे सोपे जात आहे. गांजाचे सेवन केल्यानंतर हे तरुण एकमेकांवर चौवतारतात. त्याच बरोबर फुकणीच्या जोरावर दुचाकीस्वार शहरभर धूम ठोकताना दिसून येत असून तरुणांमध्ये आता गांजा फुकण्याची स्पर्धा वाढली. त्यामुळेच अवैध विकीला उधाण आलेले दिसतात. परिणामी पालकांनी विश्राम मध्ये न राहता सावधान! राहण्याची गरज असून, पोलिस प्रशासनानेही गांजाबाबत सतर्क राहणे अत्यन्त आवश्यक असल्याचे चर्चील्या जात आहे.
तालुक्यात गांजाच्या झुरक्यात व्यसनाधीनता इतकी भयावह आहे की, 'उनके नशे मे' म्हणत तोकड्या दमडी साठी काहीही करायला हे तरुण धजावतात. असेही एकीवात आहे की, व्यसन जडलेली हे तरुण काठी "ओये" कडे धाव घेत आहेत. त्यामुळे या व्यसनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. ह्या गंभीर प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन गांजा तस्कर व विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




Previous Post Next Post