सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
शहरात उत्सव काळात शांतता राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्ष राहत पोलिसांनी महत्वाच्या रस्त्यावरुन हा रुट मार्च काढला. आगामी ईद ए मिलाद ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला.
यावेळी पोलीस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार व होमगार्ड रूटमार्च करीता आदिसह पोलीस कर्मचारी सहभागी होते. तरी गणेश उत्सव संबंधाने कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक, डॉ. आंबेडकर चौक, गौशिया मज्जिद व पोलीस स्टेशन मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले. यावेळी ठाणेदार खंडेराव यांनी समस्त जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिस प्रशासनाचा मारेगाव मध्ये पथ संचालन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2023
Rating:
