सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. तर रात्रीतून काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अशातच 5 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजताच्या दरम्यान, मारेगाव तालुक्यातील फेफरवाडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून पडलेली वीज थेट तुरी व कपाशी वर पडली.
तालुक्यात 5 सप्टेंबर रोजी दुपार पासूनच तालुक्यातील अनेक भागात बदललेल्या हवामानाचा पाऊस बरसला. दरम्यान, पडलेल्या विजेमुळे सहा एकरातील दहा गुंठे ओल्या कपाशी व तुरी च्या वरी जळून खाक झाली आहे. अंदाजे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी खुशाल गमे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. या बाबत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांने तहसीलदार निलावाड यांना 06/09/2023 रोजी निवेदन दिले आहे. परंतु आतापर्यंत संबंधित विभागाकडून साधी विचारपूस किंबहुना पिकांचा पंचनामा करण्यात आला नसल्याची खंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांने 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना व्यक्त केली आहे.
गमे यांची सहा एकर शेती फेफरवाडा शिवारात आहे. 5 सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातसह फेफरवाडा येथे अवकाळी पावस झाला, यात सुमारे त्यांचे सहा एकरातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुक्यात झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे फेफरवाडा येथील खुशाल गमे यांना चांगला फटका बसला आहे. त्यांना शासनाकडून वीज पडून जळून खाक झालेल्या पिकांचा नुकसानीचा मोबदला मिळावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
वीज पडून शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2023
Rating:
