सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मानव सेवा करणे हे मी माझे आद्यकर्तव्य समजतो. ज्या लोकांनी शिबिरात सहभाग घेतला त्यांचे मी विशेष धन्यवाद मानतो. या सेवेच्या निमित्ताने आपण सर्व माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त करत असतात. मी सर्वांना एकच नम्र आवाहन करू इच्छिते की, ज्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली, त्याचा मी सदैव ऋणी राहील. भविष्यात माझ्या हातून चांगले कार्य व सामाजिक उपक्रम घडत राहील,असे मध्यमांशी बोलताना विजयबाबू चोरडिया म्हणाले.
वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मागील आयोजित शिबिरामध्ये सहभाग घेतलेल्यांना अकराशे च्या वर चष्मे वाटप करण्यात येत असताना आज जैताई मंदिर येथे जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती, वणी,बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विजय चोरडिया यांच्या उपस्थितीत मोफत चष्मे वाटप केले. यावेळी वणी तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तराहून अभिनंदनाचा वर्षाव सह समाधान व्यक्त होत आहे.
जनसेवक विजयबाबू चोरडिया यांच्या वाढदिवस निमित्ताने मोफत चष्मे वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 15, 2023
Rating:
