सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आज वणी येथील जैताई मंदिर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला. यामध्ये मारेगाव, कायर येथील रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर आज वणी येथील जैताई मंदिर येथे रुग्णांनी मोफत नेत्र तपासणी केली गेली यात सुद्धा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेतला. गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक कार्याचा वारसा जपत विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे.
चोरडियाजी यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मोठा असून रंजले गांजल्याना ते सैदव धाऊन जाण्यात त्यांचा मुळ स्वभाव आहे. प्रसिद्धी च्या कोसोदूर राहून कुठलाही गाजावाजा न करता, दिनदुबळ्यांना मदतीचा हात पुढे करण्यात त्यांचा प्रांजळपणे सरसावत असतो. वणी-मारेगाव-कायर येथे संपन्न झालेल्या शिबिरातील रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करुन, चष्म्याचे वाटप करण्यात येणार आहे. तर शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांना सेवाग्राम येथे आज 2 सप्टेंबर (शनिवार) ला रवाना करण्यात येणार आहे. असे आयोजकांच्या वतीने माहिती देण्यात आली.
सेवाग्राम येथील संपूर्ण खर्चाची जबाबदारी विजय चोरडिया यांनी घेतली असून रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी विजय चोरडिया मित्र परिवार घेणार आहे. यावेळी जैताई मंदिर परिसरात नेत्र तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्ठमी समिती बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच उमेश पोद्दार मित्रपरिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.