Top News

रोजगार हमी योजनेचा उडाला फज्जा ; मजुरा ऐवजी मशीनचा वापर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र रोजगार हमी योजना ची सुरुवात "ग्रामीण भागातील उपजीविकेची सुरक्षा वाढवणे आणि प्रत्येक घरातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात किमान 100 दिवसांचा हमी मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देणे" या उद्देशाने सुरू करण्यात आले. मात्र, या मनुष्यबळ योजनेला ठेकेदार संबंधित विभाग बघल देत, आपलंच हित जोपासत असल्याची तक्रार प्रहार ग्राहक संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कडे करण्यात आली आहे.

मारेगाव तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप करण्यात आला आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रहार ग्राहक संघटनेने तक्रार केली आहे. पंचायत समिती मारेगाव अंतर्गत मनरेगा योजना अंतर्गत सन 2022 - 2023 या वर्षात सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता तसेच मजुराऐवजी मशिनव्दारे कामे सुरू आहेत. मजुर कामावर हजर नसताना त्यांची उपस्थिती दाखवून मजुरी पत्रके काढणे, काही ठिकाणी कामे झाली नसताना सुध्दा मजुरांची उपस्थिती दाखवून बोगस मुल्यांकन करून कामाचे रकमा काढल्या जात असून हे वरिष्ठांच्या मर्जीनुसार केल्या जात असल्याचे दिसून येते आहे. यासंदर्भात प्रहार ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम यांनी म्हटले आहे की, तालुक्यात कोणत्याच ठिकाणी कामे मजुरांच्या हातून करण्यात आले नाहीत. विभाग प्रमुखांनी आपल्या मर्जीत लोकांना हाताशी धरून ही कामे केली आहेत. मजूर दाखवून त्यांचे बिले काढून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे या सर्व कामाची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

आता या रोजगार हमीच्या सर्व कार्यप्रणालीणावर वरिष्ठ अधिकारी काय पाऊल उचलतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
Previous Post Next Post