काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी साधला तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्याशी संवाद

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेश अध्यक्ष तेलंगणा राज्याचे प्रभारी व नवनिर्वाचीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस नेते मा. माणिकराव ठाकरे यांच्या वाढदिवसनिमित्त मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अभिष्टचिंतन शुभेच्छासह पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सभापती गौरीशंकर खुराणा, मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार, आकाश बदकी, तुळशीराम कुमरे, अंकुश माफूर, गौरव आसेकर यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी नेते मा. माणिकराव ठाकरे यांनी बाजार समितीचे लोकप्रिय नवनिर्वाचित सभापती गौरीशंकर खुराणा यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, ठाकरे यांनी तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्याशी चर्चा करून पक्ष कमिटीची विचारपूस केली. काही समस्या जाणून घेतल्या, काही सूचनाही केल्याचे गौरकार सांगितले.

पुढे बोलतांना मारोती गौरकार म्हणाले की, या औचित्याने जुन्या नव्याची भेट गाठ, जेष्ठानी केलेले मोलाचे मार्गदर्शन यामुळे नव्या नेतृत्वाला, युवा पिढीला एक एनर्जी, उत्साह मिळाल्याने समाधान आहे. 'इंडिया' साठी आम्हां सर्व कार्यकर्त्यांना अशा भेटीगाठी पावर बँक ठरणार आहे. 
Previous Post Next Post