सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : चहा म्हणजे चहा असतो,कधी मिळाला तरी वाह वाह असतो. उन्हाळा, हिव्हाळा असो की, पावसाळा चहा लोक आवडीने घेतात. हाच आवडीचा चहा मारेगावात 'प्रेमाचा चहा'... आपलेपणाचा स्वाद... शुभारंभ करण्यात आला.
शहरातील मारेगाव रोडवर असलेल्या पंचायत समिती च्या अगदी जवळ सदर प्रतिष्ठानचे उदघाटन आयुष्यमान इंगळेजी यांचे हस्ते संपन्न झाले. मा श्री मुनेश्वर साहेब, श्री गौतम दारुंडे, श्री गोरखनाथ पाटील, श्री भैय्याजी कनाके, श्री माणिक कांबळे, श्री अविनाश लांबट, श्री संजय जिवने, श्री सुरेश लांडे, कुमार अमोल, यासह इतर मान्यवरांची यावेळी प्रतिष्ठानला उपस्थिती होती.
यावेळी भदंते यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून प्रेमाचा चहाची भूमिका विषद केली. भीम गायक, शाहीर भीमदास नाईक (ता.नेर) यांनी शुभारंभ प्रसंगी भीमशक्ती शिवशक्ती गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.
या वेळी प्रेमाचा चहा चे संचालक विजय भाऊ कांबळे यांना शुभेच्छासह त्यांचे अभिनंदन केले. या शुभारंभ प्रसंगी प्रेमाचा चहा प्रतिष्ठानचा शुभारंभ रिबीन कापून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
शुभारंभ प्रसंगी "प्रेमाचा चहा..." आपलेपणाचा स्वाद,भावी ग्राहकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्धता करण्यात आले होते. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य मान्यवरांनी साखरेचा चहा व गुळाचा चहाचा मनमुराद आस्वाद घेतला, यावेळी अनेकांनी घुट घेत प्रेमाचा चहा वर स्तुती सुमने उधळली. प्रेमाचा चहाचे संचालक विजयभाऊ कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.