एकोना खाणीत शक्तिशाली ब्लास्टिंग, अनेक गावांना बसतोय हादरा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : एकोना (ता. वरोरा) ओपन कोळसा खाणीत नियम धाब्याव‍र बसवून शक्तीशाली ब्लॉस्टिंग करण्यात येते. वेकोलितील ब्लास्टिंगचे भुकंपागत बसणारे धक्के धोकादायक असून त्यामुळे मार्डी परिसरातील गावकऱ्यांचे आयुष्यच हादरले आहे. उच्च दाबाच्या ब्लास्टिंग मुळे काही गावांना बसत असल्यामुळे कंपन (हादरे) तात्काळ बंद करण्यासह अन्य मागणीचे निवेदन भारतीय युवा मोर्चा च्या वतीने तहसीलदार निलावाड यांना देण्यात आले.

वरोरा तालुक्यातील एकोना वेकोलिकडून शक्तीशाली ब्लास्टिंग सुरू असल्यामुळे यामुळे शिवणी, कानडा, मुकटा, चनोडा चोपण, दांडगाव, आपटी, गोरज, हिवरा, वनोजा देवी इत्यादी गावांना दुपारी अंदाजे 2 ते 3 वाजता हादरे बसत आहे, मार्डी परिसरातील काही घरांना तडे जात आहे, यामुळे घरांची वयोमर्यादा कमी होऊन लवकर पडण्याची भीती आहे, त्यांचसोबत ब्लास्टिंग मुळे वयोवृद्ध यांना नाहक त्रास होत असून लहान मुलं झोपेतून ताडकन उठत आहे, त्यामुळे त्यांच्या मानसिकेतेवर परिणाम होत आहे. परंतु याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करित असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

मारेगाव तालुक्यातील एकोना (ता.वरोरा) ओपन कोलमाईन्स मधून मोठ्या प्रमाणात हादरे नमूद परिसरातील गावांना हादरवून सोडत असल्याने या खुल्या कोळसा खाणींचे ब्लास्टिंग (हादरे) त्वरित बंद करण्यात यावे, जेणेकरून मकानाची वयोमर्यादा टिकून राहील व लहान मुलांच्या मानसिकतेवर आघात होणार नाही, परिणामी खाणीत होणारे ब्लास्टिंग थांबवावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा सचिव प्रसाद ढवस यांनी मारेगाव तहसीलदार यांना निवेदनाद्वारे वणी मतदार संघांचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या उपस्थितीत केली.

निवेदन देताना जिल्हा सचिव प्रसाद ढवस, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, विजय खिरटकर, प्रशांत भंडारी उपसरपंच यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तथा शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
Previous Post Next Post