Page

अविनाश लांबट मित्र परिवारातर्फे नवनिर्वाचित सभापती गौरी शंकर खुराणा यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी गौरी शंकर खुराणा यांची, तर उपसभापती पदी जीवन काळे यांची निवड झाली. बाजार समितीवर माजी आमदार वामनराव कासावार व नरेंद्र पाटील ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे. दरम्यान, पक्षाचे दिग्गज संचालक गैर हजर राहल्याने नागरिकांत विविध आता चर्चा सुरू झाली आहे.

बाजार समितीच्या 18 संचालकांपैकी 17 सदस्य महाविकास आघाडीचे निवडून आले, तर भाजपला एक जागा मिळाली. पदाधिकारी निवड तारीख निश्चित झाल्यानंतर सभापती पदासाठी पाटीलाचे यांचे विश्वासू आसुटकर यांची निवड निश्चित मानली जात होती. दरम्यानच्या काळात खुराणा, आसुटकर, डोये आणि खंडाळकर हेही स्पर्धेत उतरले त्यांच्यासाठी वरिष्टाकडून फिल्डिंग लावल्या जात होती. सभापती पदासाठी लॉबिंग सुरू केले होते. एवढेच नाही, तर पक्षाचे एकमेव असलेले चंद्रपूर आर्णी मतदार संघांचे भाऊ यांच्या दरबारात हा विषय गेला होता. अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. 

क्षणाक्षणाला नाट्यमय वळण घेणाऱ्या बाजार समिती वर मात्र, काल रात्री गौरी खुराणा व जीवन काळे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. तरी देखील कोणी रुसू नये यासाठी पक्ष श्रेष्टीनी आज मत जाणून घेतली असता त्यात मागील वर्ष भऱ्यापासून सर्व सामान्य जनतेच्या कार्यात सहभागी होणाऱ्या संस्थापक अध्यक्ष या जनसेवकाची पसंती विशेष सरस ठरली. त्या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हिरमोड झालेल्या पक्षाचे दिग्गजांनी उपस्थितीत राहण्याचे टाळले. त्यामुळे बाजार समितीवर बिनविरोध सभापती व उपसभापती निवडून आले.

गट तट बाजूला सारून नवनिर्वाचितांचे उत्सहात स्वागत अभिनंदन करण्यासाठी वसंत जिनींग मध्ये मित्रपरिवार असो की विविध पक्षाचे पुढारी यांची रिघ लागली होती. या अनुषंगाने आज मंगळवारला मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी निवडून आलेले सन्माननीय गौरी शंकर खुराणा यांचा बाजार समितीचे संचालक, उपसरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांनी आपल्या मित्र परिवारासह त्याचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव तथा उपसरपंच सुरेश लांडे, सामाजिक कार्यकर्ते तथा उपसरपंच अजय भाऊ आसुटकर, वंचित चे तालुका अध्यक्ष गौतमभाऊ दारुंडे, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सामाजिक कार्यकर्ता जय नारायण बदकी, प्रदीप डाऊले, पंढरी पाटील लांबट, नगरसेवक आकाश भाऊ बदकी यांची उपस्थिती होती