टॉप बातम्या

आक्रमक युवा नेतृत्वाला शिवसेनेत मोठी जबाबदारी; आशिष खुलसंगे जिल्हाप्रमुखपदी नियुक्त

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने पक्षाने युवा आणि आक्रमक नेतृत्वावर विश्वास दाखवत आशिष खुलसंगे यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रासह यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आशिष खुलसंगे यांनी यापूर्वी युवासेना उपजिल्हाप्रमुख, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध सामाजिक संस्थांमधून प्रभावी काम करत जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. ग्रामीण भागातील विकासकामे, संघटन कौशल्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानुसार त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शिवसेना संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नियुक्तीनंतर आशिष खुलसंगे यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, "शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे हेच माझे प्रमुख ध्येय राहील," असे सांगितले.

त्यांच्या नियुक्तीचे विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत अभिनंदनाचा वर्षाव केला असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();